Thursday, 1 January 2026

3/2026

 



***

'Don't wait for inspiration. It comes while working' – Henri Matisse


***

काम करने से ही काम होगा

***

तू किंवा मी

विषयापासून सुटू पाहताना

आपण झालो विषय एकमेकांचे


तुझं अलवार असणं

तुझं सहज माझ्या देहावर उतरणं

मला खडबडीत खडक होण्यापासून वाचवत राहतं


मी तुझ्या डोळ्यात मोर चितारतो

हातावर नक्षत्रांचा पाऊस

माझ्या तृष्णेचा पिसारा

उघडतो तुझ्या सर्वांगावर


माझ्यासाठी तू

सहजसुलभ कविता होत चालली आहेस

जी वाचत वाचत मी

होऊन जातो कवितेची वही


कविता हा काही खेळ नाही

की करमलं नाही तर खेळत राहायचं दिवसरात्र


तू नितळ झरा आहेस

वाहत वाहत माझ्यापर्यंत आलेला आता माझ्या आटलेल्या विहिरीतून पाणी येत राहील वर वर


तू किंवा मी

जरी अप्राप्य एकमेकांना

या वाहत्या पाण्यावर


तरीही तू माझी कविता होऊन माझ्या पाठीच्या बरगड्यांतून फुलासारखी उगवत राहतेस


आपण विषय झालो आहोत

एकमेकांचे

 

दिनकर मनवर  (पाण्यारण्य)

No comments:

Post a Comment

24/2026 Sempe

  Boldly cascading down the steep slopes of Mount Gravillac to plunge into the Cretaceous limestone plateaus, this water re-emerges in the s...